उपमहापौरपद निवडीची प्रक्रिया जाहीर; सुनील खडकेंना मिळू शकते संधी !

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेत उपमहापौरपदासाठी निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून यात पक्षाचे नगरसेवक सुनील खडसे यांना या पदावर संधी मिळू शकते असे संकेत मिळाले आहेत.

अलीकडेच जळगावचे महापौर डॉ. अश्‍वीन सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झालेली आहे. यावर वर्णी लावण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असतांनाच आता याबाबतची निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यात उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

उपमहापौरपदासाठी ५ ते ९ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुटीचे दिवस वगळता नामनिर्देशनपत्र मिळणार आहेत. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. तसेच ११ रोजी सभा सुरू झाल्यानंतर छाननी करून माघारीसाठी पंधरा मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. यानंतर उपमहापौर पदाची निवड होणार आहे.

उपमहापौर म्हणून आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तथापि, या पदावर सुनील वामनराव खडके यांना हे पद मिळू शकते असे संकेत मिळाले आहेत. ते माजी विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांचे चिरंजीव आहेत. एकनाथराव खडसे यांनी भाजपचा त्याग केल्यानंतर जळगाव महापालिकेत लेवा पाटीदार समाजाला कोणतेही पद नसल्याने भविष्यात अडचणी येऊ शकतात. हाच विचार करून सुनील खडके यांच्या माध्यमातून लेवा समाजाला उपमहापौरपदाची संधी देण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

Protected Content