देवकर, महाजनांची गळाभेट

93e131d0 76e0 4387 a087 6872baf822a0

 

धरणगाव (प्रतिनिधी) मागील सात वर्ष एकमेकाविरुद्ध टोकाची भूमिका घेतल्यानंतर आज माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी चक्क एकमेकाची गळाभेट घेतलीय. झालं, गेलं विसरून कामाला लागावे, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत दोघांनी कार्यकर्त्यांना दिला.

 

धरणागावात आज राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने कामाला लागण्याच्या सूचना गुलाबराव देवकर यांनी दिल्या. तर ज्ञानेश्वर महाजन यांनी यावेळी मनाची सर्व खंत बोलून दाखवत आज पासून आम्ही पक्षाच्या कामाला लागू, असे सांगून देवकर यांची गळा भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content