श्री संत मुक्ताबाई रामपालखी जळगावातून पंढरपूरकडे रवाना

muktai palkhi

जळगाव प्रतिनिधी | १४७ वर्षांची परंपरा असलेल्या संत मुक्ताबाई रामपालखी वारीचे हे १५ जून रोजी श्रीराम मंदिरातून सायंकाळी ५ वाजता निघून या पालखीचा मुक्काम अप्पा महाराज समाधीस्थळी केला आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास शहरातील विविध भागातून शिवाजी पार्क येथील संत मुक्ताबाई पादुकाचे दर्शन घेवून पंढरपूरकडे जाण्यासाठी शिरसोलीकडे रवाना झाले. यावेळी रामेश्वर कॉलनी आणि मेहरूण परीसरातील भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

 

संत मुक्ताबाई राम पालखीचे वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे १६ जून रोजी अभंग, आरती करण्यात आली. सकाळी 8 वाजता मार्गस्थ झाली. जिल्हा सामान्य रूग्णालय, पांडे चौक, कंजरवाडा, सिंधी कॉलनी, इच्छादेवी चौक, तांबापूरा, डि मार्ट आणि शिवाजी उद्यानाजवळील मुक्ताई पादूका येथे आगमन झाले. सकाळी अल्पोहार केल्यानंतर शिरसोलीकडे रवाना झाली. दुपारचा मुक्काम शिरसोली येथे, तर रात्रीचा मुक्काम वावडदा येथे होणार आहे. दुसऱ्या दिवशी वावडदा येथून पालखीचे प्रस्थान होऊन दुपारी सामनेर येथे तर रात्रीचा मुक्काम दुसखेडे येथे होणार आहे.

muktai

चौधरी कुटुंबियांनी केले पालखीचे स्वागत
गेल्या 60 वर्षांपासून संत मुक्ताबाई रामपालखी शिवाजी उद्यान पार्कजवळ असलेल्या संत मुक्ताबाई पादुकाचे दर्शन घेण्यासाठी पालखी येत असते. स्व. नथ्थू भारदू चौधरी यांनी पालखीच्या सोबत येणाऱ्या भाविकांना चहा, नास्ता देण्याचा पायंडा सुरू केला. आज त्यांची चौथी पिढी ही पंरपरा संभाळत आहे. सकाळी 9 वाजेच्या सुमारास चौधरी कुटुंबियांनी पालखीसह भाविकांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
स्व.नथ्थू भारदू चौधरी, प्रल्हाद नथ्थू चौधरी, शांताबाई नथ्थू चौधरी यांच्य स्मरणार्थ चौधरी कुटुंबियांनी पालखीच्या स्वागतासाठी तयारी केली होती. अर्जून चौधरी, विष्णू चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, नेताजी चौधरी, मोतीलाल चौधरी, लिलाधर चौधरी, किरण चौधरी, भागवत चौधरी, विनोद चौधरी, शुभम चौधरी, दिपक चौधरी, तेजस चौधरी, लोकेश चौधरी, पंकज चौधरी, राधाबाई चौधरी, रत्नाबाई चौधरी, इंदूबाई चौधरी, उषाबाई चौधरी, संगिताबाई चौधरी, मायबाई चौधरी, मनिषा चौधरी, प्रतिभा चौधरी, वर्षा चौधरी, छाया चौधरी, मनोहर चौधरी, रामकृष्ण चौधरी, पूजा चौधरी, पूनम चौधरी, किर्ती चौधरी, प्रिती चौधरी, भाग्यश्री चौधरी, चेतना चौधरी, यश चौधरी, साई चौधरी, दिपक चौधरी यांच्यासह आदींनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Protected Content