पहूर पेठ येथे महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा ( व्हिडीओ )

0

Pahur mahavir

पहूर ता.जामनेर (वार्ताहर) । पहूर येथे महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिलीप बेदमुथा यांच्या तर्फे जयंतिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवान महावीर यांची प्रतिमा भव्य दिव्य अशा रथावर ठेवून प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.

यावेळी पहूर पेठ येथील जैन स्थानकापासून भव्य दिव्य अशा शोभायात्रेस सुरूवात झाली. शोभायात्रा पहूर पेठ, पहूर कसबे व बसस्थानक मार्गावरून नेण्यात येवून औरंगाबाद रोडलगत असलेल्या दिलीप बेदमुथा यांच्या घराजवळ शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी शिवम बोहरा (रतलाम), माजी जि.प.कृषी सभापती प्रदिपभाऊ लोढा, किशोर कोटेचा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संघपती हिरालाल छाजेड, प्रकाशचंद लोढा, प्रितेश लोढा, पंकज लोढा, विनोद लोढा, पंकज छाजेड, अनिल कोटेचा, विकास लोढा, राजेश लोढा, प्रविण लोढा, प्रकाश बेदमुथा, अनिल बेदमुथा, बबलू कोटेचा, यांच्या सह तरूण नवयुवक जैन मंडळ पदाधिकारी व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी दिलीप बेदमुथा परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!