जळगाव, प्रतिनिधी । आज आरोग्याची बैठक महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात घेण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आरोग्य समिती सभापती चेतन सनकत, स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, भाजपा गटनेते भगत बालाणी, कैलास सोनवणे, कुलभूषण पाटील, प्रशांत नाईक आदी उपस्थित होते.
आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती
महापौर हे वेळेवर हजार असतांना आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील १० मिनिटांनी बैठकीला उपस्थित झालेत. यावर महापौर यांनी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. या बैठकीला जे एसआय व मुकादम अनुपस्थित होते त्यांना नोटीस बजविण्याचे आदेश देण्यात आले. बैठकीत महापौरांनी एसआय यांना डायरी व पेन चे वाटप केले. एस आय यांना प्रत्येक प्रभागातील ४ नागरसेवकांपैकी दोन नगरसेवकांना प्रत्यक्ष भेटणे व उर्वरित दोघा नगरसेवकांना फोन वरूनमाहिती देणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. एस आय व मुकादम यांचा व्हॉट्स ऍप ग्रुप तयार करण्यात येणार असून यात अधिकारी, विरोधक, सत्ताधारी नगरसेवक यांचा समावेश असणार आहे. या ग्रुपमध्ये सफाईकर्मचाऱ्यांची हजेरी बुकची कॉपी टाकण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्यात. उद्या प्रभाग ५ मधील संपूर्ण साफसफाई करण्यात येणार आहे. तर बांधकाम विभागातील मजूर हे शहरातील सर्व दुभाजकाची स्वछता करतील. या बैठकीला लेखाधिकारी वाहुळे, सहाय्यक आयुक्त पाटील, बांधकाम विभागाचे सुनील भोळे, आदी उपस्थित होते.
आयुक्तांनी घेतली वाहनचाकलांची माहिती
दरम्यान, मनपाचे प्र. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनीही वाहन विभागाती कर्मचाऱ्यांची माहिती मागविली. यात १३५ पैकी ६३ जण कुठे न कुठे नियुक्त करण्यात आला आहे. स्वच्छतेचा मक्त्ता देण्यात आल्याने मक्तेदाराकडून स्वत:चे चालक नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मनपाचे उर्वरीत वाहन चालक यांच्याकडे काहीही काम नसल्याचे निदर्शनात घेत या वाहन चालकांना इतरत्र काम लावण्याचा सुचना डॉ. ढाकणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच वाहन चालकांनी देखील इतर विभागा काम करण्याची तयारी दाखवावी अशा सुचना देत प्रत्येक कर्मचरी हा महत्वाचा असल्याचे सांगितले.