घरकुल निकालाच्या धास्तीत स्थायीची सभा ; अभ्यासपूर्वक प्रस्ताव मांडण्याचा सदस्यांचा आग्रह

d83f9bfe 4d3a 41f7 a6a0 7b6761707d44

 

जळगाव (प्रतिनिधी) कचरा प्रक्रियेच्या बायोमायीनच्या प्रस्तावर मक्तेदाराने इतर ठिकाणी काम अपूर्ण केले आहे. त्यामुळे काही दिवसापासून घडलेल्या घडामोडीमुळे आपण सतर्क रहाणे आवश्‍यक असून अडचणीत येणारे प्रस्ताव सभेत नको, अशी भूमिका सत्ताधारी भाजपच्या सदस्या उज्वला बेंडाळे यांनी घेतली. तर भाजप सदस्य सुनील खडके यांनी सौ. बेंडाळे यांचे समर्थन करत काही दिवसापूर्वी घरकुलच्या निकालामुळे चलबिचल असून येणारे प्रस्ताव हे विचारपूर्वक व अभ्यास करून आले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावर ” नो वर्क नो मिस्टेक’ या भुमीकेकडे न पाहता सदस्यांनी प्रस्तावांना मंजूरी द्यावी,अशी विनंती आयुक्त डॉ. टेकाळे यांनी केली. थोडक्यात ‘घरकुल’ निकालाची धास्ती आज महापालिकेत झालेल्या स्थायी समितीच्या सभेत स्पष्टपणे दिसून आली.

 

महापालिकेची स्थायी समितीची सभा आज स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त अजीत मुठे, उत्कर्ष गुटे, मिनीनाथ दंडवते, मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे, नगरससचिव सुनील गोराणे उपस्थित होते. स्थायी समितीच्या सभेच्या विषयपत्रिकेवर 12 विषय होते. बारापैकी दोन प्रस्तावावर चर्चा होवून ते स्थगीत केले. तर दहा विषय बहुतमावर मंजूर करण्यात आले.

 

आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत घनकचरा प्रकल्पा ठिकाणावरील साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रस्तावर सत्ताधाऱ्यांनी मक्तेदाराच्या कामांची माहिती घेवून पुढील सभेत विषय घ्यावा. तसेच घनकचरा प्रकल्प नविन उभारणीच्या कामाचे टेंडर प्रक्रियेवर मुद्दे घेत दोन्ही विषय स्थगीत ठेवले. तर शिवसेना व एमआयएमच्या सदस्यांनी प्रत्येक विषयाला तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात नगरसेवकांनी सावध भूमिका घेतलेली होती. यावेळी कराड व पंढरपुर महापालित या मक्‍तेदाराने बायोमायनींगचे काम अपूर्ण केले आहे. त्यामुळे मक्तेदाराच्या कामांची माहिती घेवून पुढील सभेत हा विषय घ्यावा. काही दिवसापासून घडलेल्या घडामोडीमुळे आपण सतर्क रहाणे आवश्‍यक असून अडचणीत येणारे प्रस्ताव सभेत नको असे भाजप नगरसेविका बेंडाळे म्हणाल्या.

 

तर भाजप सदस्य सुनील खडके यांनी सदस्या सौ. बेंडाळे यांच्या समर्थन करत काही दिवसापूर्वी घरकुल घोटाल्याचा निकाल लागला. या निकाल सर्वांना विचार करायला लावणारा असल्याने सर्वांचे मन सद्या विचलीत आहे. त्यामुळे मनात धास्ती आहेच. त्यामुळे येणारे प्रस्ताव हे विचारपूर्वक व अभ्यास करून आले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी दुसरीकडे भाजपकडून दोन प्रस्तावांना स्थगिती तर प्रत्येक प्रस्तावार शिवसेना व एमआयमचे सदस्य तठस्थ राहण्याची भूमीका घेतली. यावर आयुक्त डॉ. टेकाळे म्हणाले, घडलेल्या घटना नक्कीच विचार करणाऱ्या असल्या तरी शहरातील विकास कामांबाबत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना काम करण्याची जबाबदारी तर पारपाडावीच लागणार आहे. त्यामुळे ” नो वर्क नो मिस्टेक’ या भुमीकेकडे न पाहता सदस्यांनी प्रस्तावांना मंजूरी द्यावी, आचारसंहितेपूर्वी हे कामांना कार्यादेश देणे आवश्‍यक असल्याने हे कामांना विनंती स्थायी सभेला यावेळी आयुक्तांनी केली. थोडक्यात प्रत्येक विषयाकडे नगरसेवक सावधपणे बघत होते.

 

यावेळी शहरातील बड्या मालमत्ता थकबाकीदारांच्या मालमत्ता लिलावाच्या प्रस्तावर शिवसेना सदस्य विष्णू भंगाळे यांनी ज्या मालमत्ता धारकांची मालमत्त जाहीर लिलाव करता आहे त्यांची ऐवढी मोठी थकबाकी आहे का ? ज्यांच्याकडे करोडो रुपये घेणे आहे त्यांची मालमत्ता जप्त केव्हा करणार? असा प्रश्न उपस्थित केला.

Protected Content