….हा तर जनतेचा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प- दरेकर

मुंबई । महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प राज्यातील जनेतची दिभाभूल करणारा व फसवा आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.

प्रवीण दरेकर प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, या अर्थसंकल्पातून सरकारने राज्यातील शेतकरी, आदिवासी, मच्छिमारांच्या तोंडाला पाने फुसली आहेत. या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील भौगोलिक साधलेला नाही, तर केवळ एक-दोन जिल्ह्यासाठी तयार केलेला अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी केली. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपयाची कर्जमाफी करणार, शेतकर्‍यांना चिंतामुक्त करणार व कर्जमुक्तीचे वचन देणारे नेते आता सत्तेत आले, पण त्यांनी आता या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांची सपशेल निराशा केल्याची टीका दरेकर यांनी केली. ते पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पात आदीवासींसाठी कुठलीही नवीन योजना व भरीव तरतुद केलेली नाही. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करणा-या या सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कुठलीही ना नवीन योजना आणली ना शिक्षणासाठी भरीव तरतूद केली अशी टीकाही प्रविण दरेकर यांनी केली.

Protected Content