भुसावळ विभागात रेल्वे प्रवासात ‘नो बिल नो पेमेंट’ संकल्पना

WhatsApp Image 2019 07 10 at 7.42.24 PM

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वे भुसावल विभागामध्ये ५ जुलै पासून ‘नो बिल नो पेमेंट’ ची संकल्पना सुरु करण्यात आली आहे.

रेल्वे प्रवासात नागरिक खाद्यपदार्थ खरेदी करत असतात. हे खाद्यपदार्थ खरेदी केल्यावर प्रवाशांनी त्याचे पक्के बिल घ्यावे अशा सूचना रेल्वे मंत्रालयाने दिल्या आहेत. चालत्या गाडीमध्ये अथवा प्लेटफार्मवर कुठलेही खाद्य पदार्थ किंवा वस्तु विकत घेतल्यानंतर संबधित विक्रेत्याकडून पावती किंवा बिल मागावे. जर संबधित विक्रेता पावती किंवा बिल देण्यास नकार देत असेल तर प्रवास्यांद्वारे खरेदी केलेले खाद्य पदार्थ किंवा वस्तु त्यांना मोफत दिले जाणार आहे. तसेच प्रवाशांनी कोणत्याही कैटरिंग स्टाफला टिप देवू नये असे आवाहन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

Protected Content