बोदवड ‘नगराध्यक्ष’ पदासाठी शिवसेनेकडून आनंदा पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘बोदवड’ नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाकडून आनंदा पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार शिवसेना पक्षाकडून ‘बोदवड’ नगरपंचायत ‘नगराध्यक्ष’ पदासाठी आनंदा पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांच्याकडे दाखल करण्यात आला. त्यावेळी सर्व प्रमुख मान्यवर, शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आले.

 

Protected Content