मुख्यमंत्री बिस्वा व कर्नाटक सरकार विरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी राहूल गांधी यांच्या अर्वाच्य भाषेत केलेल्या वक्तव्याचा व कर्नाटक राज्यात हिजाब विरोधी धोरणाचा जळगाव जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस भवन येथे निषेध करण्यात आला.

 

कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांच्यावर अर्वाच्च भाषेत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी टीका केली आहे. याचा जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीने निषेध केला. यासोबतच कर्नाटक राज्यात हिजाबला विरोध करणाऱ्या शाळा, कॉलेज विरोधात कारवाई करण्यात यावी. हिजाबला विरोध करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी प्रतिभा मोरे, मनीषा पवार, अरुणा पाटील, यास्मिन शेख, राणी खरात, मीना सोनवणे, आशा सोनवणे, कल्पना तायडे, शबाना शे. मोसिम, अल्पिया शेख, रुबिना बी, शाईन बी, शम्मा बी, मंगला श्रीवास्तव, शाहीन बी शेख अजगर, नगमा बी शेख,शबाना बी शेख मुजफ्फर आदी सहभागी झाले होते.

 

Protected Content