पेट्रोल पंपावर सव्वा लाखांची लुट : तिघांना अटक

Crime 21

Crime 21

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसावद येथील पेट्रोल पंपावर तेथेच कर्मचारी असलेल्या सुमित भानुदास मराठे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने मॅनेजरला धमकावून एक लाख २० हजार रूपयांची रोकड लुटून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली होती़. याप्रकरणी सायंकाळी ७.०० वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा तासातच पोलिसांनी त्या कर्मचाऱ्यासह दोन जणांना अटक केली आहे़. एक संशयित मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे़.

अधिक माहिती अशी की, शहरातील आदर्श नगरातील रहिवासी आणि माजी महापौर सदाशिवराव ढेकळे यांचे पुत्र बाळकृष्ण यांच्या नावाने इस्सार पेट्रोलियम कंपनीची डिलरशिप आहे. म्हसावद येथे त्यांचा हा पेट्रोलपंप आहे. पंपावर विजय सागरे हे मॅनेजर म्हणून कामाला आहे़त. दरम्यान, सोमवारी दुपारी सागरे हे पंपाचा हिशोब करून भरणा करण्यासाठी बँकेत जाण्याच्या तयारीत असताना पंपावरच कामाला असलेला सुमित भानुदान मराठे याने आपले साथीदार बंटी दिलीप कोळी, किरण कैलास कोळी व अजय भानुदास मराठे हे त्याठिकाणी आले आणि सागरे यांना धमकावू लागले़, त्यांनी जबरीने सागरे यांच्याजवळून हिशोबाचे एक लाख २० हजार रूपये लुटून नेले़. हा प्रकार सागरे यांनी बाळकृष्ण यांचे भाऊ मधुकर सदाशिव ढेकळे यांना कळवला़, त्यानंतर दोन दिवस सुमितचा शोध घेण्यात आला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही़. अखेर बुधवारी ७.०० वाजता मधुकर ढेकळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़.

रात्री १.०० वाजता अटक
व लुटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पीएसआय योगेश शिंदे यांच्यासह त्यांच्या पथकातील बाळकृष्ण पाटील, शशी पाटील, संदीप पाटील यांनी संशयितांच्या तपासाला सुरूवात केली़. तपासचक्रे फिरवल्यानंतर सुमित हा बोरनार येथे असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली़ त्यांनी लागलीच पथकासह बोरनार येथून रात्री १.०० वाजता सुमित याच्यासह बंटी, किरण यांना अटक केली़ आहे. दरम्यान, अजय मात्र आढळून आला नाही़, गुरूवारी तिघांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़.

Add Comment

Protected Content