दुचाकी चोरट्यांला अटक; रामानंदनगर पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन जवळून दुचाकी लांबविणाऱ्या संशयित चोरट्याला तांबापुरा परिसरातून रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गणेश महाजन (वय-२०) रा. तांबापुरा ता.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाऊसाहेब दादाजी बागुल रा. आकाशवाणी चौक, जळगाव हे आपले परिवारासह वास्तव्याला आहे. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जवळ दुचाकी (एमएच ४१ आर २३६३) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान चोरून नेलेली दुचाकी ही लाडवंजारी मंगल कार्यालयावरून संशयित आरोपी राहुल महाजन हा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दिली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, विजय खैरे, पोलीस नाईक हेमंत कळसस्कर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल इरफान मलिक, विजय जाधव यांनी कारवाई करत संशयित आरोपी राहुल गणेश महाजन (वय-२०) रा.तांबापुरा, जळगाव याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.

Protected Content