जळगावात ईव्हीएमविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

d3de3cb5 5512 4587 ad9c f977b69762f9

जळगाव (प्रतिनिधी) ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी आज (१७ जून) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद व निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’, ‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

 

आगामी काळात निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर, प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत भालेराव, यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलन करतेवेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकूर, महिला महानगर अध्यक्ष कविता सपकाळे, रेखाताई शिरसाठ, युवक महानगर अध्यक्ष जितेंद्र केदार, युवक जिल्हा महासचिव अनुप पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष डिगंबर सोनवणे, खंडू महाले, गौतम सोनवणे, शांताराम अहिरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content