महापुरुषांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरणाच्या कामात भ्रष्टाचार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  पाचोरा नगरपालिकेने महापुरुषांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरणाच्या केलेल्या कामात  भ्रष्टाचार झाल्या असल्याने या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी. अन्यथा २५ जानेवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी अमित मित्तल यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 

पाचोरा नगरपालिकेने महापुरुषांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरणाच्या कामात शासनाचा लाखो रुपयांच्या निधीचा भ्रष्टाचार केला असल्याने या केलेल्या कामांची सखोल चौकशी करून या भ्रष्टाचारात सामील असलेले पाचोरा नगरपालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा २५ जानेवारी २०२३ रोजी वंचित बहुजन आघाडी शाखा पाचोरा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देते प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल बागुल, पाचोरा तालुका महासचिव दिपक परदेशी, पाचोरा तालुका उपाध्यक्ष सुनिल कदम, प्रसिद्धी प्रमुख आकाश पवार, शेख मुस्ताक शेख गफूर तसेच महिला आघाडीचे संगिता साळुंखे, शबनम जमादार, कल्पना परदेशी, राहुल सुरवाडे, ललित घोडके सस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content