Home Cities एरंडोल टोळी गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

टोळी गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
100

एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील टोळी या गावातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील टोळी या गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २४ डिसेंबर रोजी रात्री अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह झोपलेली होती. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी फूस लावून पळवून नेले. दरम्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही आढळून आली नाही. अखेर सोमवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.


Protected Content

Play sound