घरात घुसून महिलेला जीवेठार मारण्याची धमकी देत विनयभंग

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी २८ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २४ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता महिला ही आपल्या घरी एकटी असतांना गावात राहणारा गणेश गोकुळ अहिरे हा तिथे आला. महिला घरातील कामे करत असतांना तिला लज्जा उत्पन्न हाईल असे बोलून तिचा हात पकडला. तसेच तुला आणि तुझ्या मुलीला मारून टाकेल अशी धमकी दिली. हा प्रकार महिलेने तिच्या नातेवाईकांना सांगितला. पिडीत महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी २६ डिसेंबर रोजी संशयित आरोपी गणेश गोकुळे अहिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव करीत आहे.

Protected Content