नियम डावलून एकाच ठेकेदारावर कामांची खैरात : चौकशीची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यू प्रतिनिधी | येथील नगर परिषदच्या माध्यमातून शहरातील कार्यक्षेत्रात शासकीय नियम व अटीशर्ती बाजुला ठेवुन निकृष्ट  प्रतिच्या कामांची मालिका गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू आहे. या सर्व कामांची वरिष्ठ पातळीवर तात्काळ चौकशी करून संबंधीत भ्रष्ट  ठेकेदारावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

 

या संदर्भात वृत्त असे की, यावल नगर परिषयच्या कार्यक्षेत्रातील विस्तारीत वसाहतीसह डंपींग ग्राऊंड मार्ग व आदी विविध ठिकाणी राज्य शासनाच्या कोटयावधी रुपयांच्या निधीतून विकासाची कामे झाली आहे किंवा करण्यात येत आहे.  या शासकीय निधीतून होणाऱ्या विकास कामांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने वारंवार एकाच भ्रष्ट वृत्तीच्या ठेकेदारास सदरची कामे का ? दिली जात आहे असा प्रश्न यावलकरांसमोर उपस्थित होत आहे. नगर परिषदच्या माध्यमातून यावल शहरातील व विस्तारीत वसाहतीमधील रस्ते डांबरीकरण , कॉक्रीटीकरण , दुर्तफा गटारी, नगर परिषदचे महत्वकांशी प्रकल्प डंपींग ग्राउंड रस्ता आदी विकासाची कामे सर्व शासकीय नियम धाब्यावर ठेवुन ही काम करण्यात आली आहेत किंवा   येत आहे.  याविरोधात जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. असे असतांना अशा भ्रष्ट ठेकेदारास वारंवार कामे का दिली जात आहे ? या सर्व विषयांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात येवुन या चौकशी अंती संबंधीत ठेकेदाराचे नांव काळया यादीत टाकण्यात यावी व अशा भ्रष्ठ वृत्तीच्या ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

 

Protected Content