Home क्राईम चोपडा रोडवर गुटख्याची गाडी पकडल्याने खळबळ

चोपडा रोडवर गुटख्याची गाडी पकडल्याने खळबळ

0
121

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील चोपडा रोडवर आज गुटख्याची गाडी पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी ही कारवाई केली आहे.

या संदर्भात अधिक असे की, चौपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकश रावल हे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धरणगाव येथे नियोजित कार्यक्रमासाठी पै होते. याचवेळी क्रीडा संकुलजवळ एक संशयित वाहन त्यांना आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात विमल गुटखा, सिगारेट, सुगंधी सुपारी यासह विविध पदार्थ आढळून आलेत. यावेळी पोलिसांनी संतोष राजेंद्र चौधरी (रा. धरणी चौक, धरणगाव) या संशयितास ताब्यास घेतले.

संशयितास ताब्यात घेतल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी त्याच्या घराची देखील झाडाझडती घेतली. त्यात आणखी दोन-तीन पोते भरून माल आढळून आला. याप्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, या कारवाईमुळे धरणगाव परिसरातील गुटखा माफियामध्ये खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound