Breaking : कौटूंबिक न्यायालयातील लाचखोर सहाय्यक अधीक्षकाला रंगेहात पकडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तक्रारदारला पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी जळगाव कौंटुबिक न्यायालयातील सहाय्यक अधिक्षकाने अवघ्या २०० रूपयांची लाच मागतांना जळगाव लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा कौटुंबिक वाद जळगाव शहरातील बी.जे. मार्केट मधील कौटूंबिक न्यायालयात सुरू होता. तक्रारदाराने त्याची पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार आलोसे कौटुंबिक न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक हेमंत दत्तात्रय बडगुजर याने लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार याने जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार गुरूवार २ फेब्रुवारी रोजी पथकाने बी.जे. मार्केट परिसरातील गोविंदा कॅन्टीन येथे सापळा रचला. त्यानुसार सहाय्यक अधीक्षक हेमंत बडगुजर याने २०० रूपयांची लाचेची रक्कम स्विकारताच पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्यासह पथकाने केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content