चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील ओढरे येथील वीस वर्षीय युवतीचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील ओढरे येथील कु. पुजा गबरू राठोड (वय-२०) या युवतीचा गावातील एका विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची थरारक घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचणामा केला. व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तत्पूर्वी या घटनेने ओढरे गावात शोककळा पसरली असून ह्या ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष अशोक राठोड यांच्या त्या बहिण होतं. दरम्यान याप्रकरणी अशोक राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भगवान माळी हे करीत आहे.