उधारीचे पैसे मागितल्याने डॉक्टरांवर विळ्याने हल्ला

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तालुक्यातील उचंदे येथील डॉक्टरांवर एकाने विळ्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, उचंदा येथील डॉ. विजय भास्कर जाधव ( पाटील ) यांची सुकळी येथील ब्रिजलाल सूर्यभान पाटील यांच्याकडे उधारी बाकी होती. या उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे त्याने डॉ. विजय भास्कर जाधव ( पाटील ) यांच्यावर विळ्याने वार केला. यात त्यांच्या गालास जखम झाली आहे.

या संदर्भात डॉ. विजय भास्कर जाधव ( पाटील) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, मुक्ताईनगर पोलीस स्थानकात भा.दं.वि.कलम ३२४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार आसीम तडवी हे करीत आहेत.

Protected Content