Home धर्म-समाज फैजपूर येथे एकदिवसीय सामुहिक श्री गजानन विजय महापारायण

फैजपूर येथे एकदिवसीय सामुहिक श्री गजानन विजय महापारायण


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील जय गजानन गृपच्या वतीने आयोजित श्री गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रकट दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे 13 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी एकदिवसीय श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.

एकदिवसीय श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायणाला मुखोद्गत वक्ते मु.कराड जि. सातारा येथील जयंत मराठे व संजीवनी मराठे यांच्या रसाळ वाणीतून शिवाजीनगर फैजपूर येथे सकाळी ७.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत होणार आहे. श्री व सौ मराठे यांचा श्री गजानन विजय ग्रंथ जसाच्या तसा तोंडपाठ आहे.

ज्या भाविकांकडे ग्रंथ नसेल त्यांना वाचण्यापुरता उपलब्ध करून दिला जाईल. शारीरिक दृष्टया बसण्यास असमर्थ आहेत त्यांना पारायणासाठी खुर्चीची व्यवस्था केलेली आहे. या पारायानासाठी सुमारे १ हजार १०० भाविक महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात येथून आवर्जून हजर असतात. सर्व पारायण करणाऱ्यांसाठी फराळ व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्व गजानन भक्तांनी या परायणाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन दीपक होले, विलास टोके, डॉ. अभिजित सरोदे, संजय झांबरे, वसंत चौधरी, प्रमोद धांडे, प्रमोद सरोदे, मनोहर चौधरी, अनिल फेगडे यांच्यासह आदींनी केली आहे.


Protected Content

Play sound