भुसावळात स्व. बी.सी. बियाणी यांना आदरांजली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील बियाणी एज्युकेशन ग्रुपचे फाउंडर स्व. बी. सी. बियाणी (मामाजी) यांच्या नवव्या पुण्यस्मरणनिमित्त त्यांना विविध स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी कांताबाई बियाणी, बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, आ. संजय सावकारे, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, अभियंता रोनक बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी, पियुष बियाणी, एसएसजीबी आयटीआयचे प्राचार्य एस.के. शुक्ला, गोपाळ ठाकूर, राजू पारीक, प्रवीण भराडीया, रमाकांत महाजन, महेंद्रसिंग ठाकूर, किरण कोलते, निक्की बत्रा, अजय नागरानी, किरण महाजन, प्रमोद सावकारे, भालचंद्र पाटील, सुनील महाजन, प्रशांत पाटील, अतुल झांबरे, रमेश नागराणी, संजय नाहाटा, देवा वाणी, सत्यनारायण गोडीयाले, गोपाल तिवारी, प्रल्हाद फालक यांच्यासह प्राचार्य डी.एम. पाटील, रुद्रसेन गंठिया, कांचण जोशी यांच्यासह बियाणी मिलिटरी स्कूल व बियाणी पब्लिक स्कूलचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.

यावेळी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी मामाजी बी सी बीयाणी यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले, ते म्हणाले की, मामाजी हे दानशूर व्यक्तिमत्व वाले होते. मामाजींनी हजारो लोकांवर उपकार केले आहेत. तसेच कित्येक लोकांना मदतीचा हात मामाजींनी दिलेला आहे. मामाजींच्या हस्ते त्यावेळी बरीचशी चांगले काम झालेले आहेत, ती कायमस्वरूपी आमच्या स्मरणात आठवणीत राहतील.

Protected Content