Home Cities धरणगाव जिवाजी महालेंच्या स्मृतिदिनानिमित्त नाभिक समाजातर्फे अभिवादन

जिवाजी महालेंच्या स्मृतिदिनानिमित्त नाभिक समाजातर्फे अभिवादन

0
113


धरणगाव, प्रतिनिधी | येथील समस्त नाभिक समाजाच्या वतीने नररत्न जिवाजी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक नररत्न वीर जिवाजी महालेंच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले. सर्वप्रथम संत सेना महाराज, छत्रपती शिवाजी राजे आणि वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विविध घोषणांनी स्फूर्तिदायक वातावरण निर्माण झाले होते. ‘होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी’ या गोष्टीचे स्मरण केल्यामुळे एक वेगळीच प्रेरणा मिळाली. उपस्थित सर्व समाज बांधवांनी याप्रसंगी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी माजी प्र.नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, एस.पी. जल चे संचालक सचिन पाटील, विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, नाभिक समाजाचे अध्यक्ष अशोक झुंजारराव, राजे छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष नामदेव मराठे, तृप्ती रेस्टॉरंटचे प्रथम सूर्यवंशी, वीर जिवाजी महाले सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. बी. एल. खोंडे, तालुकाध्यक्ष रविंद्र निकम, शहराध्यक्ष अमोल महाले यांच्यासह सतिश बोरसे, प्रभाकर बोरसे, ज्ञानेश्वर झुंजारराव, दिपक बोरसे, महेश फुलपगार, रवि निकम, निलेश कुंवर, सचिन झुंजारराव, सोपान वारुळे, उज्वल महाले, जगन फुलपगार, कालू अहिरे, कैलास पाटील, सचिन पाटील, आकाश पवार, विकी निकम, शुभम सोनवणे, सागर झुंजारराव, कमलेश बोरसे, आकाश झुंजारराव, पप्पू पाटील, गणेश निकम, जितू पाटील, समाधान पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound