विंध्यवासिनी माता मंदिर परिसर वृक्षारोपण

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील सर्वोदय बहुउद्देशीय संस्थेच्या “हरित निर्माण” उपक्रमांतर्गत बांबरुड (राणीचे) येथील विंध्यवासिनी माता मंदिर परिसरात डोंगरावर १५१ स्वदेशी प्रजातीतील वृक्षांची लागवड करण्यात आली.

 

विंध्यवासिनी  माता मंदिर कार्यकारी समिती अध्यक्ष गंगाराम देवरे हलवाई यांच्या हस्ते औदुंबर वृक्ष लागवड करण्यात येऊन त्यांचे मार्गदर्शनात वृक्ष लागवड करण्यात आली. सर्वोदय संस्था व वृक्ष लागवड व संवर्धन हा अतूट बंध झाला असल्याने परिसरातील विविध ठिकाणी यावर्षी वृक्ष लागवड जोमाने सुरू आहे.  लागवड केलेली वृक्ष जगविलीच जावीत हा प्रधान हेतू संस्थेने डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी संस्थेने हरित निर्माण हा उपक्रम हाती घेतला असून गेल्या ३ वर्षापासून हजारावर वृक्ष लागवड करून जगविली सुद्धा आहेत. संस्थेच्या उद्देशास बांबरुड (राणीचे) येथील विंध्यवासिनी माता मंदिर कार्यकारी समितीसोबत जोडल्या गेलेल्या माऊली वृक्षप्रेमी गृपने सकारात्मक प्रतिसाद देत या मंदिर परिसरात सर्वोदय संस्थेच्या मदतीने वृक्ष लागवड करून घेत ती जगविण्याची हमी घेतली आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात या मंदिर परिसरात टप्प्याटप्प्याने  वृक्ष लागवड करण्याचा सर्वोदय संस्था व माऊली वृक्षप्रेमी गृप यांचा मानस आहे. त्यामुळे भविष्यात या मंदिर परिसरात वृक्षराई नटून सृष्टीचे सौंदर्य वाढणार हे मात्र निश्चित व त्यातूनच अध्यात्म उठून दिसेल असा आशावाद माऊली वृक्षप्रेमी गृप सदस्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी युवकांसोबतच लहानग्यांचा उत्साह व हातभार मोठ्या प्रमाणात लाभला हे विशेष. यासाठी  संपूर्ण लागवडीत माऊली वृक्षप्रेमी गृपने परिश्रम घेतले.

 

Protected Content