दांडी बहाद्दरांमुळे गाजली रावेर पंचायत समितीची सभा

रावेर प्रतिनिधी । युरीयासह दांड्या बहाद्दर अधिकार्‍यांमुळे रावेर पंचायत समितीची मासिक आढावा बैठक चांगलीच गाजली. प्रत्येक बैठकीला अनुपस्थित राहणार्‍यांवर सभापती जितेंद्र पाटील यांनी तोंडसुख घेत कारवाईची मागणी केली.

आज पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. यात सदस्य दिपक पाटील यांनी युरीयाचा विषय काढत शेतकर्‍यांना कृषी दुकानदार समिश्र खते घेण्यासाठी बंधने आणताय असे होता कामे नये तसे झाल्यास कृषी केंद्रावर कारवाई करण्याचे त्यांची दोन्ही कृषी विभागाला सुनावले. यावेळी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील जुम्मा तडवी सौ प्रतिभा बोरवेले योगिता वानखेडे,बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, रावेर पंचायत समितीच्या महत्वाच्या मासिक बैठकीला उपसभापती पी.के. महाजन, पंचायत समिती सदस्य,धनश्री सावळे,माधुरी नेमाडे,अनिता चौधरी,कविता कोळी या सदस्यांनी बैठकीला दांड्या मारल्या होतो

तसेच या बैठकीला सभापती तसेच पंचायत समिती सदस्य तक्रारींचा पाऊस पाडत असतांना पूर्ण बैठकीत बिडिओ दिपाली कोतवाल मौन होत्या. उलट त्यांच्या पहिल्याच बैठकीला वीज पुरवठा,बस वाहतूक,पुनर्वसन विभाग,सार्वजनीक बांधकाम, बाल विकास प्रकल्प,शालेय पोषण आहार विभागाच्या अधिकार्‍यांनी बिडिओ दिपाली कोतवाल यांच्या पहिल्याच बैठकीला दांड्या मारल्या. या सर्व प्रकारावरून सभापतींनी नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली.

Protected Content