किनगाव येथे स्व. निलेश पाटील व जयाबाई पाटील यांच्या स्मरणार्थ टेनिस बॉल खुल्या क्रिकेट स्पर्धा

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कितगाव येथे जिल्हा परिषदचे माजी सदस्य रामदास गोंडु पाटील ( आर .जी . नाना )आणि जिल्हा परिषद सदस्या अरूणाताई रामदास पाटील यांच्या सौजन्याने स्व. नितेश पाटील व स्व . जयाबाई पाटील यांच्या स्मरणार्थ मर्यादीत षट्कांच्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यावल तालुक्यातील किनगाव येथील मालोद रोडावरील मैदानावर दिनांक ७ मार्चपासून सुरू होत असलेल्या या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धत प्रवेश मिळवण्याची अंतिम मुदत ही ५ मार्च ठेवण्यात आली आहे. प्रवेश एक हजार १११ ठेवण्यात आली आहे . या खुल्या मर्यादित षट्कांच्या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धत अंतीम विजेता संघास प्रथम पारितोषिक आर. जी. पाटील ( नाना ) यांच्यातर्फ २१ हजार१११व स्मृती चिन्ह , अंतीम लढतीतील उप विजेता संघास जिल्हा परिषदच्या सदस्या सौ. अरूणाताई पाटील यांच्यातर्फ त्यांच्या हस्ते ११ हजार१११ रुपयांचे व पारितोषिक देण्यात येणार आहे. बाद फेरीतील संघास तृत्तीय क्रमांकाचे पारितोषीक किनगाव येथील युवा सामाजीक कार्यकर्ता सद्दाम शाह खलील शाह यांच्यावतीने ७ हजार ७८६ रुपयांचे बक्षीस ठेण्यात आले आहे. क्रिकेट स्पर्धचे उद्धघाटन यावल रावेर विधान सभेचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी , जेष्ठ माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी. यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील , संजय गांधी समितीचे माजी अध्यक्ष खलील शाह यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धचे शुभारंभ होणार आहे. या १० षट्कांच्या मर्यादीत स्पर्धत भाग घेणाऱ्या संघाने नेहा ईलेक्ट्रीक व मुष्कान वस्तु भांडार जामा मस्जीद जवळ किनगाव तालुका यावल येथे संपर्क साधुन प्रवेश फार्म प्राप्त करावे असे आवाहन रफीक तडवी , सचिन तडवी , सागर तडवी , मुन्ना तेली, दगडु तडवी , शरीफ तडवी , जहॉंगीर तडवी , मेहबुब पिंजारी यांनी केले आहे.

Protected Content