महाशिवरात्रीनिमित्ताने सोनी नगरात रुद्रअभिषेक, हवनपूजा उत्साहात

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील उपनगर असलेल्या पिंप्राळा परिसरातील सावखेडा रोडजवळील सोनी नगर येथील स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रम करण्यात आले.

 

महाशिवरात्रीनिमित्ताने स्वयंभू महादेव मंदिरात सकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान पुजारी चेतन कपोले महाराज यांच्या हस्ते रुद्रअभिषेक व हवन पूजा करण्यात आली. हवन पूजेसाठी सरकारी वकील सुरेंद्र काबरा त्यांची पत्नी निशा काबरा तसेच नारायण येवले, विजय चव्हाण, पंकज राजपूत, समाधान ठाकरे, मधुसूदन नागला, निलेश जोशी, सत्यजित कंखरे असे ८ जोडप्यांच्या हस्ते हवनपूजा व व रुद्र अभिषेक करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वाजता महादेवाची आरती परिसरातील भाविकांच्या हस्ते करण्यात आली. या सोहळ्याला सोनी नगर, गणपती नगर, पिंप्राळा परिसरातील *शिवभक्त उपस्थित होते.

Protected Content