Breaking : बस दुचाकीचा भयंकर अपघात; जागीच तीन ठार

वरणगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगाने धावणार्‍या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली आहे. या घटनेबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भुसावळ आगाराच्या (एमएच २० बीएल ०९४८) क्रमांकाच्या बसने (एमएच १९ सीएस ११९८) क्रमांकाच्या टिव्हीएस स्टार सिटी मॉडेलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील तीन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव फाट्याजवळ दुपारी घडली. प्राप्त माहितीनुसार हे तिन्ही युवक बोदवड तालुक्यातील मनूर गावातील असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा वरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात युवकांचे मृतदेह आणण्यात आले आहे. तर वरणगाव पोलीस स्थानकात या प्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content