यावल तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; शेतीच्या कामांना वेग

यावल प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतातील मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

बुधवारी झालेल्या पावसामुळे नागरीकांनी थंड गारवाचा अनुभव घेतला असुन संपुर्ण तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने अनेक संकटात ओढले गेलेला शेतकरी सुखावलाय. खरीपाच्या मशागत व पेरणीपुर्वीच्या शेतीच्या कामांना वेग मिळाला आहे. यावल तालुक्यात काल पावसाळ्याच्या पहील्याच पाण्याच्या दमदारसरी बरसल्या असुन तालुक्यात ४ जुन रोजी ७६.६५ मिली मिटरच्या सरासरीने यावल परिसर ७०.०, फैजपुर ६७.२, भालोद ९८.४, बामणोद ९२.४, साकळी ६७.५, किनगाव येथे ६४.० एकुण तालुक्यात ४५९ मिमिच्या सरासरी ७६.६५ तर प्रोग्रेस सरासरी ७९.७१ अशी पावसाची नोंद झाली.

पावसाच्या या दमदार हजेरीमुळे गेल्या अनेक दिवसांपासुन कोरोना संसर्गजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी बांधव यांच्या शेतीमालास कवडीमोल किमत मिळत असल्याने हताश व निराश झालेला बळीराजा आता नव्या दमाने पेरणीच्या कामास लागला असुन पावसाच्या दमदार आगमनाने सुखावला गेला आहे. यावल तालुक्यात खरिपाचे पेरणीसाठी ५१ हजार पाचशे क्षेत्रफळ हे खरिपाच्या पेरणीसाठी योग्य असल्याची माहिती यावल तालुक्यातील कृषी विभागाकडून मिळाली आहे.

Protected Content