न्हावी ग्रामीण रुग्णालयास लोकसहभागातून बेड व ऑक्सिजन यंत्रणा; जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

यावल प्रतिनिधी । रावेर-यावल तालुक्यात भविष्यात करोना रुगणांची वाढती संख्या लक्षात घेता न्हावी येथील ग्रामिण रुग्णालयात ऑक्सीजन यंत्रणा उपलब्ध करुन दिली. त्यासाठी ३० बेड तयार केले, ही यंत्रणा लोकसहभागातून उपलब्ध करुन देण्यात आली. आर्थिक मदत करणाऱ्यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यासाठी येथील सातपुडा अर्बन क्रेडीत को-ऑप सोसायटी फैजपूरतर्फे ५० हजार, लक्ष्मी नागरी पतपेढी फैजपूरतर्फे ५० हजार, कै. देविदास टिकाराम चौधरी पतपेढी फैजपूरच्यावतीने ५० हजार रुपये, सर्व नगरसेवक फैजपूर यांच्यातर्फे ४० हजार, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, फैजपूर १० हजार, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे १० हजार, तालुका खरेदिविक्री संघ यावल ५ हजार, दादासाहेब वसंतराव विष्णू पाटीलसह औद्योगिक वसाहत ५ हजार, यावल तालुका मेडिकल डिलर्स असोसिएशनतर्फे ११ हजार, अंबिका दूध उत्पादक संस्था फैजपूर ५ हजार, नितीन नेमाडे फैजपूर १ हजार, तलाठी पी.एम.तळेले, रामदास सोनू पाटील आदींनी मदत उपलब्ध करुन दिली. या सर्वांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी डॉ. अभिजित राऊत यांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योग्य ती काळजी घेण्याची गरज असून प्रत्येकाने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसिलदार जितेंद्र कुवर, रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे, यावल सभापती पल्लवी चौधरी, नरेंद्र नारखडे, गटविकास अधिकारी निलेश पाटील, पंचायत समिती सदस्य सर्फराज तडवी, जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, सरपंच भारती चौधरी, उपसरपंच सतिश जंगले, ग्रामविकास अधिकारी के.आर. देसले, सर्कल जे.डी. बंगाळे, पोलिस पाटील संजय चौधरी, तलाठी लिना राणे, दीपाली बारी, नितीन चौधरी, मिलिंद महाजन, उमेश बेंडाळे, रविंद्र तायडे, फैजपूरच्या नगराध्यक्षा महानंदा होले, इंजिनिअरिंग कॉलेज अध्यक्ष शरद महाजन यांनी सुरवातीपासून कोविड सेंटरसाठी दोन्ही वसतीगृह विनामूल्य उपलब्ध करुन दिले. सुरवातीपासून ग्रामपंचायतचा अत्यंत असा मोलाचा वाटा उचलेला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्कल जे.डी.बंगाळे यांनी केले तर आभार तहसिलदार जितेंद्र कुवर यांनी मानले. कार्यक्रमास अनेकांची उपस्थिती होती.

Protected Content