वर्डी ग्रामपंचायत प्रशासनाचे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष

चोपडा प्रतिनिधी । लॉकडाऊनला दीड महिना उलटून देखील ग्रामपंचायत प्रशासनाने प्रतिबंधात्मक साधनांची गावात मोफत वाटप का केली नाही ?असा जाब तालुक्यातील वर्डी ग्रामसेवकांना या गावातील तरूणांनी विचारला आहे.

आज देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची तिव्रता कमी करण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनला आज दीड महिना पुर्ण होत असतांना तालुक्यातील वर्डी ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी व प्रशासक यांनी गावातील नागरीकांना कोरोना प्रतीबंधक साधनांची गावात मोफत वाटप केली नाही. महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी गावातील नागरीकांना ग्रामपंचायतीकडून सॅनिटाइजर, मास्क, साबनसह इतर साहित्यांची मोफत वाटप केली. पण वर्डी ग्रामपंचायतने ही वाटप का केली नाही, वर्डी ग्रामपंचायत कार्यालयात आज २०० तरूणांनी ग्रामसेवक यांना जाब विचारला.

१४ वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार २५ टक्के निधी हा प्रतीबंधक साधनांसाठी राखीव असतो म्हणजे गावात काही आपत्ती किंवा संकट आले. मात्र ग्रामपंचायतीने यासाठी उपाययोजना का केल्या नाही? असा सवाल लहुश धनगर, गणेश चव्हाण, संदीप पाटील , विलास पाटील यांनी ग्रामसेवक यांना विचारले असता त्यांनी तो निधी गावाच्या आरोग्यनिधी म्हणून खर्च करण्यात आला असल्याचे उत्तर मिळाले. मात्र कोणताही आरोग्य निधी गावासाठी खर्च न होता तो निधी कुठे खर्च केला याचे उत्तर त्यांना देता आले नाही.

वर्डी गावा पासुन ५ किमी अंतरावर असलेले अडावदला कोरोना रूग्ण सापडल्याने आता वर्डी गावात दक्षता घेण्याची गरज आहे. आतापर्यंत गावातील कुणीही पंचायत कार्यालय आले नाही, पण आता ही बाब खपऊन घेतली जाणार नाही असें तरूणांनी सांगितले. ग्रामसेवक अधिकारी यांनी २ दिवसाच्या आत गावात कोरोना कीट वाटप करण्यात येईल असे सांगितले. दरम्यान आपल्या आरोग्या काळजी घ्यावे असे आवाहन गावातील तरूणांनी केले आहे.

Protected Content