भुसावळ प्रतिनिधी । नागपंचमीनिमित्त आज दि.५ ऑगस्ट रोजी सकाळी गोगादेवजी यांची छडी मिरवणूक वाल्मिक नगर भागातून जामनेर रोड, सातारा पुल, यावल रोड मार्गे तापीनदी काठावरील जुगादेवी मंदिरापर्यंत काढण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, या मिरवणुक प्रमुख मोहन घारु यांच्या नेतृत्वाखाली मिथून भगत, सोनू भगत, अशोक भगत, मनोज भगत, प्रविण भगत, पवन भगत, पवन भगत, शक्ती भगत, प्रदीप भगत, शंभू भगत, आकाश भगत, गणेश भगत यांनी छड्या घेतल्या होत्या. या मिरवणुकीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.