उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पर्यावरण पूरक धुलीवंदन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पर्यावरण पूरक धुलीवंदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील मध्यवर्ती कार्यलयात उपमहानगरअध्यक्ष आशिष सपकाळे यांनी आयोजन केले आहे.

 

कोरोना काळानंतर जनजीवन सुरळीत होत आहे. यातच पाण्याचा अपव्यय टाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील मध्यवर्ती कार्यलयात उद्या शुक्रवार दि. १८ रोजी सकाळी ११.३० वाजता ढोलताशाच्या गजरात पारंपरिक नैसगिर्क रंगासोबत धुलीवंदन मोठ्या उत्साहात खेळण्यात येणार आहे. तरी सर्व मनसे सैनिकांनी व शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आयोजक उपमहानगरअध्यक्ष आशिष सपकाळे यांनी केले आहे. त्यांना मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, आश्विन भोळे, किरण तळेले, राजेंद्र निकम, शिवा पुरोहित, संजू पाटील, राजू डोंगरे, इस्माईल खाटीक, कमलेश डांबर, प्रशांत बाविस्कर, स्वामीकांत पाटील, संजय वरयानी, अजय गरुड, राहुल चव्हाण दीपक राठोड, शाम शर्मा, लोकेश मावळे व आजी माझी पदाधिकारी मनसैनिक यांचे सहकार्य लाभत आहे.

Protected Content