नाथाभाऊंचा वारसा घेऊन रोहिणीताईची वाटचाल सुरु-ईश्वर रहाणे

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री  नाथाभाऊ मतदार संघ समृद्ध व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न असतांना त्यांची कन्या रोहीणीताई खडसे यांची वाटचाल सुरु असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे यांनी जनसंवाद यात्रेतील कॉर्नर सभेत केले.

 

खामखेडा पुलाची निर्मिती करून अंतुर्ली परिसर मुक्ताईनगरशी जवळच्या मार्गाने जोडले. त्यामुळे या परिसरातील लोकांचा वेळ आणि पैसा वाचला. नाथाभाऊ यांनी गेले  तिस वर्ष विकासाचे राजकारण केले आहे.  त्यांचा वारसा घेऊन रोहिणीताई सुद्धा वाटचाल करीत आहे. म्हणूनच आगामी काळात रोहिणीताईंच्या पाठीशी भक्कमपणे उपस्थित रहा असे आवाहन ईश्वर रहाणे यांनी  केले. जनसंवाद यात्रेच्या अठराव्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील दुई ,सुकळी ,सोमनगाव ,डोलरखेडा ,नांदवेल या गावात जाऊन रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांमध्ये जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष  रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने यापुढे विकासाला प्राधान्य देऊन मार्गक्रमण करीत आहे.  यावेळी जनसंवाद यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील ,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, जि. प. सदस्य निलेश पाटील, प. स. सदस्य विकास पाटील,अतुल पाटील,डॉ. बी. सी. महाजन, सरचिटणीस रविंद्र दांडगे,महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजनाताई कांडेलकर, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष नंदूभाऊ हिरोळे, तोतारामजी भोलाने,राजेंद्र चौधरी,वसंतराव तळेले बाळाभालशंकर ,जुलाल  पाटील, रउफभाई खान, शाहिद भाई खान,मुन्ना भाऊ बोडे, प्रविण दामोधरे,रंगलाल रायपुरे, नंदकिशोर नमायते, विशाल रोठे,निलेश भालेराव, चेतन राजपुत , अजाबराव पाटील, नितीन पाटील ,मयुर साठे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content