गोंडगाव अत्याचार प्रकरणाचा निषेध करत मयत चिमुकलीला मेणबत्ती पेटवून सामुहिक श्रध्दांजली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करत कांचन नगर मधील चौघुले प्लॉट येथे आझाद बहुउद्देशीय मित्र मंडळाच्या वतीने मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता मयत चिमुकलीवर मेणबत्ती पेटवून श्रध्दांजली देण्यात आली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने खून करण्यात आला होता. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत कांचन नगर येथील चौघुले प्लॉट परिसरात आझाद बहुउद्देशीय मित्र मंडळाच्या वतीने मयत चिमुकलीसाठी मेणबत्ती पेटवून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सहा वर्षाची आराध्या मिलींद दलाल हिने आपल्या भावना व्यक्त करत म्हणाली की, “या घटनेत माझ्या ताईला किती वेदना झाल्या असतील, असा प्रकार घडून नये यासाठी आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे” असे बोलून तिने मेणबत्ती पेटवून हात जोडून श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी मित्र मंडळाचे सदस्य अमोल पाटील, मिलींद दलाल, राहूल शिंदे, प्रविण चौधरी, जितेंद्र पाटील, हितेश शिंदे, विजू शिंदे, राहूल पाटील, प्रदिप मावळे, ललित चौधरी, लालू चौधरी, अमोल नन्नवरे, अकाश राजपूत, गोपाल परदेशी, सुधिर पाटील, आनंद सपकाळे, सुनिल पाटील, विनोद कोळी यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते.

Protected Content