शनीपेठ ठाण्यात पोलीसांशी हुज्जत; तिघांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । फाट्या चौकात आरडाओरड, धमकी, सरकारी कामात अडथळा व पोलीस आवारात पोलीसांशी हुज्जत घालणाऱ्या करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांवर शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, पोउनि खेमराज परदेशी, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, परीष जाधव, राजेंद्र कोलते, शरद पाटील, संदीप पाटील यांनी पोलीस कर्मचारी रविंद्र भारंबे यांनी फोन करून सांगितले काट्या फाईल चौकात एक व्यक्ती धिंगाणा घाल असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळाले की त्या व्यक्तीच्या भाऊ व आई यांनी घरी घेवून गेले. त्यामुळे सर्व पोलीस कर्मचारी घरी पुन्हा आले. थोड्या वेळाने तोच व्यक्ती पुन्हा चौकात येवून आरडाओरड करत असल्याचे समजले. त्यानुसार पुन्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी चौकातून तरूणाला आणले. चारूदत्त रविंद्र पाटील असे त्या तरूणाचे नाव आहे. ठिकाणी चारूदत्तचा भाऊ निर्भय रविंद्र पाटील आणि आई सुमन रविंद्र पाटील हे देखील शनीपेठ पोलीस ठाण्यात आले. दारूदत्तने आरडाओरड करण्यास सुरूवात केली आणि माझ्यासोबत बाचाबाची करणाऱ्यांनाही माझ्यासमोर आणा असे सांगून वाद घातला. दरम्यान तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करता येईल असे पोलीसांनी सांगितल्यानंतर तिघांनी पोलीसांची हुज्जत घालण्यास सुरूवात केल्याने सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील यांनी आवराआवर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पैसे घेवून तुम्ही आरोपींना आणत नाही असा आरोप पोलीसांवर केला. आम्ही शिवसेना कार्यकर्ते असून दंगल घडवून आणू अशी धमकी देवून पोलीसांशी वाद घातला. सरकारी कामात अडथडा निर्माण केल्याप्रकरणी शनीपेठ पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे करीत आहे.

Protected Content