Home क्रीडा टी-२० वर्ल्ड कप: भारताचा श्रीलंकेवर धमाकेदार विजय

टी-२० वर्ल्ड कप: भारताचा श्रीलंकेवर धमाकेदार विजय


मेलबर्न (वृत्तसंस्था) भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार विजय मिळविला आहे.

 

सेहवाग शफाली वर्माच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. भारताने ए ग्रुपमधील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर ७ विकेट आणि ३२ चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत लंकने भारताला ११४ धावांचे आव्हान दिले होते. या विजयासह भारताने ग्रुपमध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. चार विकेट घेणाऱ्या राधा यादवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण त्यांचा तो निर्णय पूर्णपणे चुकला.


Protected Content

Play sound