अल्पसंख्यांक आरक्षण व योजनांची अंमलबजावणी करावी; तहसीलदारांना निवेदन

यावल प्रतिनिधी । येथील शहरातील अल्यसंख्यांक समाजातीलअसंख्य सुशिक्षीत बेरोजगार तरुणांनी तहसीलदार यांना निवेदन देवुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्याकडे लक्ष वेधुन त्या मान्य करून तिची अमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात लाखो उच्च शिक्षीत बेरोजगार अल्पसंख्याक तरूण असुन, महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे शासन आल्यापासुन शासनाने तात्काळ निर्णय घेवुन अतिवृष्टी व दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या बळीराजा शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा चांगला निर्णय घेतला असुन, शासनाने मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाचा करीता पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली होती, त्याचबरोबर अल्पसंख्यांक समाजास आर्थिकदृष्टया सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेले व बेरोजगार तरूणांना रोजगाराची संधी उपल्बध करण्यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळापुनश्च पुर्नगठीत करून गरजुंना तात्काळ व्यवसायाकरिता कर्ज मिळण्याची तरदुत करावी, महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य ग्रंथालयाचे वेतनश्रेणी व अनुदानात वाढ करणे, महाराष्ट्र राज्यातील उर्दु अकादमीची नवीन रचना करणे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक पदवीधर बेरोजगार आहे .या विविध विषयासह महाराष्ट्र शासनमान्य ग्रंथालयाचे मागील सात ते आठ वर्षापासुन वेतनवाढीचा प्रश्न अद्याप प्रलंबीत असुन, नविन वाचनालयांना मान्यता वर्गवाढ करणे आदी विषयांची राज्यातील महाविकासआघाडी शासनाने आपल्या जाहीरनाम्यात घोषणा केली असुन, या सर्व मागण्याकडे शासनाने तात्काळ लक्ष देवुन अमलबजावणी करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या
निवेदनावर आबिद खान युनुस खान, वसीम खान, आरीफ मेहमुद शाह, अरबाज युनुस खान, रफीक शेख मजीद,, ईद्रीस सतार शाह, फारूक रशीद तडवी, तौफिक हारून खाटीक, जाकीर ताहेर खान, सलीम अहमद खान, नाजीम सरदार खान, एस. एस. शेख, ईम्रान लतीफ खाटीक आदी अल्पसंख्यांक तरूण बेरोजगारांच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content