फैजपूर शहरात विविधी ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा

फैजपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील विविध परिसरातील हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने महाभिषेक करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मोठे मारोती मंदीर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने महाभिषेकप्रसंगी पुरोहित यांच्याकडून कल्पेश खत्री व अमित बाळापुरे व बजरंग ग्रुप तर्फे महाअभिषेक करण्यात आला. यावेळी विनोद गलावडे, शिवाजी रावते, रमेश गलवाडे, धोंडू सोनवणे, रणजित राजपूत बंडू काठोके यावेळी उपस्थित होते. शहरातील जानकी नगर मधील पंचमुखी हनुमान मंदिरात रोहिदास चौधरी व पंडित धांडे यांच्या हस्ते पंचमुखी हनुमानाचा अभिषेक पूजा आरती करण्यात आली. पुरोहित नंदू जोशी यांनी पौरहित्य केले. त्रिवेणी हनुमान मंदिरात वैभव आनंदा वकारे हस्ते पूजा आरती अभिषेक करण्यात आली.पुरोहित उदय दीक्षित यांनी धार्मिक विधी केले. आठवडे बाजार श्रीरामपेठ मधील हनुमान मंदिरात अप्पा वैद्य यांचे हस्ते पूजा,अभिषेक आरती करण्यात आली पुरोहित तुषार पाठक यांनी विधिवत पूजा केली. मोठा मारुती मंदिरा समोर कला शिक्षक राजू साळी यांनी रांगोळी काढली.

जानकी नगरमध्ये ८०० भाविकांनी व आठवडे बाजारात १४०० भाविकांनी तर त्रिवेणी हनुमान मंदिरात ५००० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी रोहिदास चौधरी, निखिल चौधरी, श्याम चौधरी, पंडित धांडे, गजानन सुरवाडे, सुनील राणे, प्रमोद पाटील, प्रभाकर खाचणे, श्रीकृष्ण पाटील, योगेश फालक जानकी नगर मधील कार्यकर्ते तसेच वैभव वकारे, अक्षय परदेशीं मित्र परिवार यांनी आठवडे बाजारातील जय अंबिका दुर्गाउत्सव मित्र मंडळाने कामकाज पाहिले. संपूर्ण शहरातील वातावरण हे भगवेमय झाले होते.

Protected Content