इच्छा तिथे मार्ग ! लखानी कुटुंबानी ठेवला निसर्गासमोर एक नवा आदर्श

बुलडाणा प्रतिनिधी । आज सर्वत्र वृक्ष लागवडीचे व ग्लोबल वॉर्मिंग बद्दलच्या गप्पा मारल्या जातात पण कृतीतून करायची वेळ आली की काढता पाय अनेक वेळा घेतला जातो. फक्त फोटो सेशन करून वृक्षारोपण दिसून येते पण याला अपवाद दिसून आला. बुलडाण्यातील मलकापूर येथील लखानी कुटुंबानी निसर्गासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

घरातील काही पुरातन वस्तू प्राणी किंवा झाड यांच्याशी न कळत आपले प्रेम जोडल्या जाते हे आपल्याला कळत देखील नाही, असेच काहीच लखानी कुटुंबांबाबत त्यांच्या घरातील तब्बल शंभर वर्ष जुनं कडुनिंबाचे झाड म्हणावे लागेल. लखानी कुटुंब सुरुवातीपासूनच पर्यावरणप्रेमी म्हणून ओळखले जाते त्यांनी डिजिटल गुगल माध्‍यमातून वृक्ष प्रत्यारोपण कोण करते. याबाबत माहिती घेत नागपूर येथील एक चमू वृक्षारोपण करत असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना पाचारण करीत त्यांच्या जागेतील कडुनिंबाचे झाड नवीन जागेवर स्थलांतरित केले त्यांना काहींनी फक्त तीन ते चार हजार रुपये खर्च करून सदर झाड तोडण्या करीता नागरिकांनी सांगितले होते मात्र त्यांनी स्पष्ट नकार देत जवळपास दोन लाखांपर्यंत खर्च करून या झाडाचे प्रत्यारोपण केले आहे. याबाबत मलकापूर शहरात सोबत जिल्ह्यातला हा पहिलाच प्रत्यारोपणाचा एवढा मोठा प्रयोग असल्याचं सांगितल्या जाते त्यामुळे किमान या निमित्ताने तरी आता प्रत्यारोपण वृक्षाचे पॅटर्न सुरू होईल असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही

 

Protected Content