अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरेत पाण्याचे आवर्तन, परिसरास दिलासा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे.

 

‘अक्कलपाडा’तून पांझरा नदीत पाणी सोडले ४०० क्युसेकचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत  धरणाच्या दोन दरवाजे २० सेंटीमीटरनेवर उचलून ४०० क्युसेकने पहिले आवर्तन सोडण्यात आले.

 

अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील पांझरा नदीवरील धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांसाठी अजंदे,बेटावद,वालखेडा, व अमळनेर तालुक्यातील गावांसाठी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी टंचाई  परिस्थितीवर एक आवर्तन सोडणेसाठी निर्णय घेऊन पाणी सोडण्यात आले.

 

दरम्यान, अमळनेर तालुक्यातील मांडळ,मुडी ,बोदर्डे, कळंबु, ब्राम्हणे, भिलाली, शहापूर, डांगर बु, एकतास, तांदळी, निम, जवखेडा वावडे, एकलहरे, लोण खु, व लोण बु.पाण्यामुळी या गावांचे पाणी टंचाई प्रश्‍न  सुटणार आहे, धुळ्याचे माजी आमदार शरद पाटिल, यांच्या पाठपुराव्यामुळे याला यश आल्याने  प्रशासनाने दखल घेत पाणी सोडण्यात आले आहे.

 

पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने अमळनेर तालुक्यातील  मुडी,बोदर्डे,मांडळ ,कळंबू, आजंदे,बेटावद,या गावांच्या सरपंच आणि जनतेने प्रशासनासह माजी आमदारांचे  आभार मानले.  यावेळी संतोष चौधरी,राज राजपुत,प्रविण संदानशिव,काशिनाथ पटिल,मिलिंद भावसार यादी उपस्थित होते.

Protected Content