मारूळ येथील उर्दु हायस्कुलला आ.चौधरी यांनी दिली भेट

यावल प्रतिनिधी । आमदार शिरीष चौधरी यांनी नुकतीच तालुक्यातील मारूळ येथील आयडियल उर्दू हायस्कूलला भेट दिली. तसेच यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या व्यवस्थापनाची तपासणी केली गेली. कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी शाळेत भेट दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र सरकार कडून दि.०८ डिसे.२०२० पासून शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून शाळेतील वातावरण स्वच्छ करून संपुर्ण शाळा खोल्यांचे निरर्जतुकीकरण करणे व आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना योग्य प्रकारे लक्ष ठेवण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या निमित्ताने आ.शिरीष चौधरी यांनी शाळेला आकस्मिक भेट दिली.व स्वहस्ते शाळेतील मुख्याध्यापक शेख अशफाक याकूब यांचे आकसीमिटरने पल्स व तापमान तपासले शिवाय वर्ग खोल्या व परीसर व्यवस्थानाची तापसणी करण्यात आली.

शाळेतील विदयार्थ्यांना आवश्यक त्या खबरदारीचे आवाहन केले. तसेच कोविड १९ची खबरदारी बद्दल मुख्याध्यापक व कर्मचारी बांधवांना नियमांच्या अमलबजावणी च्या सुचना देण्यात आल्यात आमदार शिरीष चौधरी यांचे सोबत जिल्हा परिषदचे गट नेता प्रभाकर अप्पा सोनवणे, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, यावल खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरूड जाविद जनाब, अकीलोद्दीन फारूकी होते. शालेय व्यवस्थापनाचे पदाधिकारी शमुशफिक जनाब इनायतजनाब, रफतअली, कबीरोद्दीन फारूकी, खलिक जनाब, लुकमान जनाब, युसूफ जनाब, अली अहमद, इस्हाक जनाब, जमानत जनाब, मुश्ताक सर, गफ्फार जनाब, नाज़िर जनाब, लायक सर, कय्यूम सर, विकार सर, खालिक सर, मुफ्ती अबुज़र, तसेच सचिव इमरान अली व अध्यक्ष बशारत अली सर, यांनी साहित्य खरीदी साठी व्यवस्था केली. शाळेतील मुख्याध्यापक शेख अशफाक शेख याकूब व त्यांचे सहकारी शिक्षक इस्हाक सर, अशफाक सर, जमीर सर,हुदा सर, महेमूद सर, रिज़वान सर, फुरकान सर, अफरोज मेडम, मेयार सर, इरफान सर, रहमत सर, रसूल सर, जाविद सर, निसार, रफत अली अब्दुल मुतल्लीब आदिनी सुचनेचे पालन केले.

 

Protected Content