सार्वजनिक भव्य कीर्तन महोत्सव अंतर्गत उद्या गौरव पुरस्कार प्रदान समारंभ

भुसावळ प्रतिनिधी । वांजोळा रोड वरील आपले परिवार सार्वजनिक वाचनालय व सद्गुरु धनजी महाराज प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सार्वजनिक भव्य कीर्तन महोत्सव अंतर्गत उद्या 11 जानेवारी शनिवारी दुपारी 2 वाजता गौरव पुरस्कार प्रदान समारंभ राज्याचे महसुल व वनविभागाचे सहसचिव श्यामसुंदर पाटील व भुसावळ डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांचे शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे.

आपले नैमित्तिक कार्य इमानेइतबारे करून सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या संस्था, मंडळ, ग्रुप, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक उद्योजक, समाजसेवक, पत्रकार, लिपिक यांना गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित केले जाणार आहे. रात्री ठीक आठ वाजता ह भ प श्री राजेंद्र महाराज केकत निंभोरा तालुका जामनेर यांचे कीर्तन होईल. मुंबई पनवेल येथील शुभांगी सरोदे यांची माऊली ज्ञानेश्वर ही एकपात्री एकांकिका सादर होणार आहे.

12 जानेवारी रविवारी सकाळी नऊ वाजता दिंडी सोहळ्यानंतर हभप तुळशीदास महाराज नांदेड यांचे काल्याचे किर्तन व दुपारी बारा वाजता कृतज्ञता ऋणानुबंध सन्मान सोहळा व उत्सव नेतृत्वाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजल्यानंतर महाप्रसादाचे वितरण होऊन सार्वजनिक भव्य कीर्तन महोत्सवाची सांगता होईल.

Protected Content