टोकरे कोळी समाजाच्या तरुणांचा उद्रेक : ना.पाटील यांना घेराव (व्हिडीओ)

NA. Patil gherav

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील टोकरे कोळी समाजाच्या तरुणांनी आपल्या समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना घेराव घातला. गेल्या १५ वर्षांपासून समाजाच्या या मागण्या प्रलंबित असल्याने आज (दि.२९) दुपारी या तरुणांच्या भावनांचा तालुक्यातील विदगाव येथे अचानक उद्रेक झाल्याचे दिसून आले.

 

सहकार राज्यमंत्री ना. पाटील आज विदगाव जवळून जात असताना या शेकडो तरुणांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना घेराव घालीत जाब विचारला. यावेळी ना.पाटील यांनी याबाबत आपली ताकद कमी पडल्याची कबुली तरुणांना दिली. टोकरे कोळी समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, ही समाजाची प्रमुख प्रलंबित मागणी असून अन्यही काही मागण्या आहेत. गेल्या १५ वर्षांपासून या मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते, मात्र त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. त्यामुळे आज कोळी समाजातील तरुणांनी त्यांच्या भागातील लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री ना. पाटील यांना घेराव घालून जाब विचारला.

याच प्रश्नावर समाजातील सामाजिक कार्यकर्ते अॅड. गणेश सोनवणे यांनीही ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना मागण्यांची पूर्तता न झाल्याबद्दल संताप व्यक्त करीत समाज बांधवाना आपल्या मागण्यांसाठी एकत्र येवून लढण्याचे आवाहन केले. आश्वासन पूर्ती न केल्याबद्दल त्यांनी ना. पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली.

 

 

Protected Content