राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मनपास्तर नेहरू हॉकी स्पर्धा

WhatsApp Image 2019 08 29 at 6.29.36 PM

जळगाव, प्रतिनिधी |मनपास्तरीय नेहरू चषक स्पर्धेला क्रीडा संकुलावर एकलव्य पुरस्कार प्राप्त कांचन चौधरी व हॉकी महाराष्ट्राचे तथा हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या स्पर्धात  गोदावरी व अँग्लो संघ विजयी झालेत.

राष्ट्रीय क्रीडा दिन असल्याने स्पोर्ट्स हाऊस तर्फे आमिर शेख यांनी विजयी व उप विजयी संघास तसेच उत्कृष्ट खेळाडूस पदक दिले . स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभास मनपाचे उप महापौर डॉ. अश्विन सोनवणे, हॉकी महाराष्ट्राच्या सह सचिव प्रो. डॉ. अनिता कोल्हे, जळगावचे सचिव फारूक शेख, आमिर शेख व मनपा क्रीडा अधिकारी चंद्रकांत वांद्रे यांची उपस्थिती होते. स्पर्धेतील उत्कृष्ट खेडाळू :झय्यान शेख (अँग्लो उर्दू), जयेश चौधरी व कनिष्का सोनी (गोदावरी) हे ठरले.

Protected Content