Home Cities भुसावळ भुसावळात जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळात जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
111


rajmata jijau

भुसावळ प्रतिनिधी । राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठा समाजातर्फे रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जिजामाता यांच्या प्रतिमा पुजन 12 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमानिमित्त खिचडी, फळ वाटप आणि रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांना सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भुसावळ शहर व तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष किरण पाटील यांनी केले आहे.


Protected Content

Play sound