डांभुर्णी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थीनीचा गौरव सत्कार

WhatsApp Image 2020 01 10 at 7.16.34 PM

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी जिल्हा परिषद  शाळेत नुकत्याच झालेल्या डिजीटल शाळा लोकार्पण सोहळ्यात इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या स्वामीनी मनोज नेवे हीने सावित्रीबाई फुले यांच्या महात्म्याचे व महिलांना मिळवुन दिलेल्या अधिकाराबाबत, शिक्षणाबाबत महत्व पटवुन देत भाषण  केले. यात स्वामीनी नेवेंचे मान्यवरांनी कौतुक केले.

 सिमा सुरक्षा दलाचे सहाय्यक उपनिरिक्षक महेंद्र पाटील यांनी स्वामीनी नेवेचे कौतुक करत संदिप वासलेकर यांचे ‘एक दिशेचा शोध हे पूस्तक भेट दिले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरणा मिळाली असुन शिक्षणाबाबत व स्पर्धेचे युग असल्याने सर्वांनी जिद्द ठेवल्यास यश प्राप्त होते हे या कार्यक्रमात बघायला मिळाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार लता सोनवणे तर प्रमुखपाहुणे म्हणुन फैजपुर विभागाचे प्रांत आधिकारी अजीत थोरबोले,जिल्हा परिषद सदस्य अरुणा पाटील , यावल सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन आर. जी. पाटील, यावलचे पोलिस निरिक्षक अरुण धनवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, पुण्याचे अक्षय कोठावदे, मानसी पाटील, रामचंद्र चौधरी, सुभाष नेहेते, संजय खर्चे, ज्ञानेश्वर कोळी, नंदकिशोर सोनवणे , प्रमोद सोनवणे, पी.ए.कडणोर, डाभुर्णीचे ग्राम विकास अधीकारी सुनिल गोसावी, अर्चना नेवे, सुलोचना नेवे, संगीता सोनवणे, रेखा कोळी, चंद्रकला कोळी, विजया कोळी आदी पंचक्रोषीतील नागरीक महीला व राजकिय पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी प्रांत आधिकारी अजीत थोरबोले पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्यासह आदी मान्यवरांनी विधार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रस्तावना संदीप पाटील यांनी केले व शाळेचे मुख्याध्यापक भरत पाटील यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षकवृंद व स्वयंदिप प्रतीष्ठान व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Protected Content