मंदिर म्हणजे आध्यात्मिक उर्जास्त्रोत ! : गोपाल चैतन्य महाराज

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी .| गुरुदेव सेवा आश्रम च्या माध्यमातून जामनेरमध्ये जानेवारी २०२४ मध्ये होणार्‍या भव्य दिव्य मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने यज्ञ शाळेचे उद्घाटन वृंदावन धामचे श्रद्धेय गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी बाबांनी संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी करून जानेवारी २०२४ मध्ये होणार्‍या मंदिर सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या व मंदिर हे भक्तजनांसाठी आध्यात्मिक केंद्र असून परिसरातील सर्व भावी भक्तांना एक सकारात्मकता देण्याचं ऊर्जा केंद्र हे मंदिरच्या माध्यमातून होईल असा आशावाद श्रद्धेय  गोपालचैतन्य जी महाराज यांनी व्यक्त केला!.

या यज्ञ शाळेच्या उद्घाटन प्रसंगाला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन हेही उपस्थित होते, त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून होणार्‍या मंदिर उद्घाटनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या वेळेला गुरुदेव सेवा आश्रमला दिले,त्याचप्रमाणे गुरुदेव सेवा आश्रम मध्ये होणार्‍या विविध शैक्षणिक उपक्रमाला ही त्यांनी शुभेच्छा व्यक्त करून सक्षम युवा घडवण्याचं कार्य गुरुदेव सेवाश्रम च्या माध्यमातून होईल असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी गुरुदेव सेवाश्रम चे श्रद्धेय शामचैतन्यजी महाराज यांनीही मंदिर निर्माण कार्यातून आध्यात्मिक ऊर्जा ही समाजाला मिळेल आणि त्यातून संस्कारशील समाज निर्माण होईल असे मत व्यक्त केले.  यावेली नवनीत चैतन्य जी महाराज , हरीश चैतन्य जी महाराज , गोकुल चव्हाण , प्रवीण राजनकर , रघुनाथ महाजन ,राजु नाईक , पंडित चव्हाण , जयसिंग राठोड़ , वीजू पाटील सुहास गवली , प्रणव पाटिल, विट्टल जाधव गणेश राठौड़ , दिलीप चव्हाण , चिंतामन राठोड़ नटवर चव्हाण, लवकुश चव्हाण देवीदास नाईक, पुखराज पवार डॉ प्रकाश चव्हाण आदि सेकडो भक्त परिवार उपस्थित होते.

Protected Content