आ. चिमणराव पाटील यांनी बाधीत रूग्णांची केली विचारपूस !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिवरे येथे दूषीत पाण्यामुळे बाधीत झालेल्या रूग्णांची आमदार चिमणराव पाटील यांनी तात्काळ भेट घेऊन विचारपूस केली.

तालुक्यातील शिवरेदिगर ता.पारोळा येथील २९ नागरिकांना शेतातील पाण्यातुन विषबाधा झाली. या विषबाधेत अगदी लहान्यांपासुन तर थोरल्यांचा समावेश आहे. या सर्व बाधा झालेल्या रूग्णांना तातडीने कुटीर रूग्णालय पारोळा येथे आणण्यात आले.

या घटनेची माहीती मिळताच आमदार चिमणरावपाटील यांनी कुटीर रूग्णालय गाठले. या ठिकाणी दाखल रूग्णांची आमदार चिमणराव पाटील यांनी स्वतः विचारपुस करून उपचाराबाबत माहीती घेतली. यावेळी सर्व आवश्यक त्या सोयी-सुविधा व उपचारास कुठलाही विलंब व दिरंगाई न करता तातडीने सर्वोतोपरी प्रयत्न करा व रूग्णांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्या. यातील विषबाधेने अतिबाधित असलेल्या रूग्णांना तातडीने पुढील उपचाराची सोय करून द्या, तसेच वरिष्ठ पातळीवर कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होता असल्यास मला कळवा. उपचारासाठी वाहन, औषधी यांसह आवश्यक बाबींची कमतरता भासल्यास ते देखील आपणांस उपलब्ध करून देण्याचे यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकार्‍यांना सांगितले.

याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, गटविकासअधिकारी विजय शिंदे, पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी,  रूग्णांचे नातेवाईक व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content